लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर बेळगाव विमानतळावर दीड लाख रुपये जप्त
आज बेळगाव येथील सांबरा विमानतळावर एका दीड लाख रुपयांची रक्कम जप्त करण्यात आली आहे. विमानतळावर दाखल झालेल्या प्रवाशांच्या बॅगची तपासणी केली असता एका प्रवाशाच्या बॅग मध्ये 1 लाख 50 हजार रूपये सापडले.
त्यामुळे लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर एसएससी पथकाने बेळगाव विमानतळ येथे एका प्रवाशांकडून एक लाख 50 हजार रुपयांची रोख रक्कम जप्त केली आहे. सदर रक्कम ज्या प्रवाशाकडे आढळली त्याचे नाव जसबीर सिंग असे आहे.
लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मतदारांना देण्यासाठी होणारी भेटवस्तू रोकड आदींसह अन्य वस्तूंची वाहतूक रोखण्याकरिता रस्ते व हवाई वाहतूक मार्गावर करडी नजर ठेवली जात आहे त्या अनुषंगाने आज बेळगाव विमानतळावर दीड लाख रुपये जप्त करण्यात आले आहे सहाय्यक निवडणूक अधिकाऱ्यांच्या सूचनेनुसार एफएसटी मारीहाळ टीम बी चे अधिकारी शशिकांत कोळेकर आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी ही कारवाई केली आहे.