लक्ष्मीनगर हिंडलगा येथे लाखो रुपयांची दारू जप्त
सीसीबी पोलीस पथकाने धाड टाकून लक्ष्मी नगर हिंडलगा येथे 9लाख 9 हजार 750रुपये किमतीच्या गोवा बनावटीची बेकायदा दारू सह एकूण 10 लाख 60 हजार 100 रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त केला आहे.
खबऱ्याकडून मिळालेल्या माहिती द्वारे सीसीबी पोलीस पथकाने ही कारवाई केली असून या कारवाईमध्ये पोलिसांनी राजेश केशव नायक वय 41 राहणार हिंडलगा याला अटक केली आहे
यावेळी पोलिसांनी खबरांनी दिलेल्या माहितीच्या आधारे लक्ष्मी नगर हिंडलगा येथे सार्वजनिक ठिकाणी गोवा राज्यातून बेकायदेशीर दारू आणून विकली जात असल्याची माहिती मिळविल्यानंतर ही कारवाई केली आहे.
या कारवाई मध्ये विविध कंपन्यांच्या सुमारे 9 लाख 9 हजार 750रुपये किमतीच्या 186 लिटर दारूच्या बाटल्या दारू वाहतुकीसाठी वापरण्यात आलेली दीड लाख रुपये किमतीची कार आणि रोख 350 असा एकूण दहा लाख 60 हजार 100 रुपये मुद्देमाल पोलिसांनी जप्त केला आहे
पोलिसांनी केलेले या कारवाईबद्दल त्यांचे अभिनंदन करण्यात येत आहे.