हिंडलगा कारागृहात पोलिसांचा छापा
कारागृहातील बेकायदेशीर कृत्य रोखण्यासाठी पोलिसांचे पाऊल
बेळगाव येथील हिंडलगा कारागृहावर पोलीस अधिकाऱ्यांनी अचानक छापा टाकून असून चौकशी करण्यास सुरुवात केली आहे. हिंडलगा कारागृहात गेल्या कित्येक दिवसांपासून बेकायदेशीर घटना घडत आहे.त्यामुळे पोलीस अधिकाऱ्यांनी आज कारागृहामध्ये अचानक छापा टाकला. यावेळी बेळगावचे डीसीपी रोहन जगदीश यांच्या नेतृत्वाखाली छापा टाकण्यात आला.
यावेळी बेळगावच्या पाच पोलीस स्थानकाचे एसीपी सीपीआय यांनी या कार्यात सहभाग घेतला तसेच हिंडलगा कारागृहात सुरू असलेल्या घटनांना आळा घालण्याकरिता हे पाऊल उचलण्यात आले.