Share News

ओमान मध्ये कार लॉरी अपघातात गोकाक मधील कुटूंबाचा दुर्दैवी अंत

बेळगाव जिल्ह्यातील गोकाक शहरातील एकाच कुटुंबातील चौघांचा दुबई येथील ओमान मध्ये रस्ते अपघातात मृत्यू झाला आहे. दुबई मध्ये कार आणि लॉरी ची समोरासमोर धडक होऊन गाडीमध्ये असलेले चौघेही जिवंत जळाले आहेत. आई मुलगा मुलगी आणि जावई हे दुबईमध्ये सहलीला गेले असता ही दुर्घटना घडली आहे. ही चौघेही एकाच कुटुंबातील आहेत. घटनेची माहिती मिळताच राज्यसभा इराणा कडाडी यांनी मृतांचे मृतदेह भारतात आणण्याकरिता खटाटोप सुरू केलाय तर परराष्ट्रमंत्री एस जयशंकर आणि प्रल्हाद जोशी यांनाही त्यांनी आवाहन केले आहे.


Share News