गोकाक शहरात रात्री शिरले पाणी
८५ घरांतील २२० जणांना निवारा केंद्रात हलविण्यात आले
गोकाकमध्ये पहाटे दोन वाजता शिरले पाणी
मार्कंडेय, ताम्रपर्णी, चित्री, बळ्ळारी नाला परिसरातील ६५,६३५ क्युसेक पाण्याची आवक घटप्रभा नदीत होत असल्यामुळे बुधवारी मध्यरात्री (दि. २०) दोन वाजता गोकाकमधील चार गल्ल्यांत पाणी शिरले. त्यामुळे ८५ घरांतील २२० जणांना निवारा केंद्रात हलविण्यात आले आहे.
हिडकल जलाशयातून ३६ हजार क्युसेक पाण्याचा विसर्ग सुरू आहे. परिणामी, गोकाकमध्ये पहाटे दोन वाजता कुंभार गल्ली, जनावरांचा जुना बाजार, हाळभाग गल्ली आणि आचार्य गल्ली येथील घरांत पाणी शिरले. अचानक पाणी शिरल्यामुळे सर्वांची धांदल उडाली. त्यामुळे सर्वांना गोकाक सरकारी पदवीपूर्व महाविद्यालयातील निवारा केंद्रात हलविण्यात आले.

