Share News

जिल्हा रुग्णालयात रुग्णांच्या आरोग्याची हेळसांड

बेळगाव जिल्हा प्रशासनाचा कामकाजावर प्रश्नचिन्ह

जिल्हा प्रशासनाविरुद्ध जनतेचा संताप

बेळगाव जिल्हा रुग्णालयात कर्मचाऱ्यांच्या चुकीमुळे एका रुग्णाला अर्धा तास बाहेर रुग्णवाहिकेची वाट पहावी लागल्या असल्याची घटना घडली आहे.या घटनेमुळे जिल्हा प्रशासनाच्या कामकाजावर प्रश्नचिन्ह निर्माण झालाय.
बेळगाव जिल्हा रुग्णालयात रुग्णांच्या आरोग्याची हेळसांड करण्यात येत आहे. बैंल होंगल तालुक्यातील एका महिलेच्या महिलेची पायाची शस्त्रक्रिया जिल्हा रुग्णालयात करण्यात येणार आहे. त्याकरिता सदर महिलेला सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल मधून जुना इमारतीत शस्त्रक्रियेसाठी घेऊन जाण्यासाठी एका रुग्णाने तब्बल अर्धा तास रुग्णवहिकेची वाट पाहिली. यावेळी मुसळधार पावसात रुग्णालयाच्या कॉरिडोर मध्ये रुग्ण आणि नातेवाईकांनी थंडीत रुग्णा ला स्ट्रेचरवर झोपवून जवळपास अर्धा तास रुग्णवाहिकेची वाट पाहिली आणि त्यानंतर शस्त्रक्रिये करिता सदर महिलेला रुग्ण वहीका आल्यानंतर जुन्या इमारतीत घेऊन जाण्यात आले यावेळी बेळगाव जिल्हा प्रशासना विरुद्ध नातेवाईकांनी संताप व्यक्त केला.


Share News