Share News

शेतकऱ्यांच्या आंदोलनात दगडफेकीची घटना :दगडफेकींमध्ये जवळपास 11पोलिस कर्मचारी जखमी

बेळगाव जिल्ह्यातील हुक्केरी तालुक्यात शेतकऱ्यांच्या आंदोलनात दगडफेकीची घटना घडली. दगडफेकींमध्ये जवळपास 11पोलिस कर्मचारी जखमी झाले आहेत त्यामुळे त्यांच्या प्रकृतीची चौकशी करण्याकरिता आज ए डी जी पी हितेंद्र यांनी जखमी पोलीस कर्मचाऱ्यांना भेट दिली आणि त्यांच्या प्रकृतीची विचारपूस केली . यावेळी म्हणाले की घटनास्थळी कोणताही अनुचित प्रकार घडू नये म्हणून मला प्रयत्न करायचे होते म्हणून मी स्वतः बेळगावात आलो आहे. आम्ही घटनास्थळावरील 40 ते 50 सीसीटीव्ही तपासत आहोत शेतकऱ्यांच्या निषेधार्थ मोठी गर्दी निर्माण झाल्याने ही घटना घडली आम्ही कोणालाही काठ्यांनी मारहाण करण्याचे निर्देश दिलेले नव्हते .मात्र आनावदनाने तो प्रसंग उद्भवला यावेळी चार ते पाच सरकारी वाहनांसह दहाहून अधिक वाहनांचे नुकसान झाले आहे .आणि इतर वाहनांचे देखील नुकसान झाले आहे. आम्ही व्हिडिओ तपासून पुढील कारवाई करू असे यावेळी बोलताना एडीजीपी हितेंद्र म्हणाले.


Share News