900 जैन बांधवांचा जनसहस्रनाम अर्चनाचा कार्यक्रम संपन्न
विश्वशांती युवासेवा समिती आणि जैन युवा संघटना यांच्या संयुक्त विद्यमाने बेळगाव शहरात धर्मनाथ भवन येथे श्री जनसहस्रनाम अर्चनाचा भक्तिमय कार्यक्रम उत्साहात पार पडला. या धार्मिक उपक्रमात सुमारे ९०० भाविकांनी मोठ्या श्रद्धेने सहभाग नोंदवला.
कार्यक्रमादरम्यान मंत्रोच्चार, सामूहिक प्रार्थना व शांततेचा संदेश देणाऱ्या उपक्रमांमुळे परिसर भक्तिरसाने भारावून गेला होता. समाजात सद्भावना, शांती आणि आध्यात्मिक जागृती निर्माण व्हावी, या उद्देशाने हा कार्यक्रम आयोजित करण्यात आल्याचे आयोजकांनी सांगितले.
कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी स्वयंसेवकांचे विशेष योगदान लाभले.

