पक्ष्यांसाठी अन्न,पाण्याची सोय
उन्हाळ्याची चाहूल लागताच बेळगुंदी येथील बालविर विद्या निकेतन विद्यार्थ्यांनी पक्ष्यांसाठी अन्न, पाण्याची सोय केली आहे.
झाडांवर भांडी बांधून त्यात पाण्यासह खाद्यपदार्थ टाकण्यात आले आहेत.बेळगुंदी येथील बालविर विद्यानिकेतन शाळेच्या परिसरात विविध वृक्ष आहेत. या वृक्षांवर बुलबुल, मैना, पारवा, कबूतर, राघू,चिमण्या, कावळा, आदी विविध रंगेबीरंगी चिमण्या नेहमी येतात. उन्हाळा सुरु झाला आहे. त्यामुळे पक्षांना अन्न, पाण्याची सोय व्हावी यासाठी या शाळेतील विद्यार्थ्यांनी आकर्षक घरटे, पाणी, अन्नासाठी भांडी तयार केली आहेत. ही घरटी, भांडी झाडावर लावण्यात आली आहेत. यात विद्यार्थी स्वत: पाणी, अन्न टाकत असून, उन्हाळ्यात पक्षांची होणारी भटकंती थांबणार आहे. विद्यार्थ्यांना मुख्याध्यापक के. डी. पाटील,प्रकाश मेटकर, गोविंद गावडे, व प्राथमिक विभागाच्या रेखा शहापूरकर यांचे मार्गदर्शन लाभले.हा उपक्रम यशस्वी करण्यासाठी शाळेतील श्रेया जाधव, समृद्धी पाटील, श्रेया नाकाडी, प्रेरणा पाटील,
यांच्यासह इतर मुला- मुलींनी पुढाकार घेतला आहे.