Share News

बेळगाव ब्रेकिंग | मंत्री हेब्बाळकर यांच्या कार्यालयावर निवडणूक अधिकाऱ्यांची धाड

महिला व बालकल्याण मंत्री लक्ष्मी हेब्बाळकर यांच्या कुवेंपुनगर येथील निवासस्थानी बुधवारी निवडणूक अधिकारी आणि फ्लायिंग स्कॉड पथकाच्या कर्मचाऱ्यांनी मंत्री हेब्बाळकर यांच्या कार्यालयात धाड टाकली.
यावेळी आशा वर्कर्स आणि अंगणवाडी सेविकांना आचारसंहिता लागू असल्याने उल्लंघन केले असल्याने त्याना चांगलेच धारेवर धरले .
लोकसभा निवडणुकीसाठी जाहीर झालेल्या निवडणूक आचारसंहितेचे उल्लंघन करत 500 जणांनी आशा आणि अंगणवाडी सेविकांची मंत्री हेब्बाळकर यांनी बैठक घेतली .या बैठकीत निवडणूक अधिकारी व फ्लयिंग स्कॉड पथकातील कर्मचाऱ्यांवर हल्लाबोल झाला.

निवडणूक आचारसंहितेचा भंग केल्याच्या पार्श्वभूमीवर निवडणूक अधिकारी आणि फ्लयिंग स्कॉड पथकाच्या कर्मचाऱ्यांवर हल्लाबोल केला. जिल्हा निवडणूक अधिकारी, नितेश पाटील, जे जिल्हाधिकारी देखील आहेत .त्यांनी नियमांचे उल्लंघन झाले असल्याने गुन्हा दाखल करण्यात आला आहे असे सांगितले .तसेच त्यांनी पुराव्या साठी , साक्षीसाठी व्हिडिओ चित्रित केला आहे .


Share News