Share News

जिल्ह्यातील सावनूर तालुक्यातील तेवरमेल्ली गावातील शिमला धाब्याजवळ राष्ट्रीय महामार्गावर मंगळवारी पहाटे मेंढ्यांनी भरलेल्या वाहनाची पुढील वाहनास धडक होऊन झालेल्या भीषण अपघातात तिघांचा जागीच मृत्यू झाला तर 10 हून अधिक मेंढ्या जागीच ठार झाल्याची घटना घडली आहे.

राणेबेन्नूर तालुक्यातील काकोला गावातील मेंढी व्यापारी मैलारप्पावय कैदला (४०), गुड्डाप्पा कैदला ४२) आणि चालक शिवकुमार होलेप्पनवार (२२) अशी दुर्दैवी मृतांची नावे आहेत.

तर उर्वरित चौघांच्या हाताला व पायाला गंभीर दुखापत झाली असून त्यापैकी बिरप्पा निंग्रज, हित्तलमणी निंगाप्पा कोरागुंडा यांची प्रकृती गंभीर आहे. जखमींना दावणगेरे येथील हुबळी रुग्णालयात दाखल करण्यात आले असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत.

बंकापूर टोलनाक्याजवळ हा अपघात झाला असून या अपघातात तीन जणांसह 20 मेंढ्यांचा मृत्यू झाला आहे.मेंढ्या घेऊन जाणारे वाहन रस्त्याच्या कडेला उभ्या असलेल्या दुसऱ्या वाहनाला धडकल्याने हा अपघात झाल्याचे सांगण्यात येत आहे.या घटनेची नोंद बंकापूर पोलीस ठाण्यात करण्यात आली आहे.


Share News