कार मधील सर्वजण मद्यधुंद अवस्थेत ,घडला अपघात
धुलीवंदनाच्या दिवशी मित्रांसोबत पार्टी करून कारने परतणाऱ्या चार मित्रांवर काळाने घाला घातला आहे. कार वरील नियंत्रण सुटल्याने भरधाव कार पहिल्यांदा झाडाला धडकली त्यानंतर पलटल्याची घटना बीजगर्णी राकसकोप धरण मार्गावर घडली आहे. चार तरुण मित्र रंगोत्सवाचा आनंद लुटण्याकरिता बाहेर गेले होते यावेळी त्यांनी मद्याप्राशन केल्याने नशेमध्ये कार वरील नियंत्रण सुटून त्यांची कार झाडाला आदळली त्यानंतर पलटी झाली. यावेळी कारमध्ये चौघेजण होते त्यामधील 3 जण जखमी झाले आहेत. त्यांच्यावर सध्या जिल्हा रुग्णालयात उपचार सुरू आहेत. यावेळी घटनेची माहिती मिळताच स्थानिक नागरिकांनी लागलीच पोलिसांनी याची माहिती दिली त्यानंतर पोलिसांनी पुढील प्रक्रिया पूर्ण केली.