Share News

भीषण अपघातात 6 जणांचा मृत्यू

मंगीनकोप ते बिडी दरम्यान अपघात

कारवरील नियंत्रण सुटल्याने घडला अपघात

लहान मुले थोडक्यात बचावली

 

Accident -बेळगाव जिल्ह्यातील खानापूर तालुक्यातील मंगणकोप्प ते बीडी गावादरम्यान आज दुपारी झालेल्या भीषण अपघातात सहा जणांचा जागीच मृत्यू झाला, तर एक जण गंभीर जखमी झाला. मृत सर्व जण धारवाडचे रहिवासी असून मृताची संपूर्ण माहिती अद्याप मिळालेली नाही.

यात एका महिलेसह चौघांचा जागीच मृत्यू झाला, तर अन्य दोघांचा रुग्णालयात दाखल करताना मृत्यू झाला. तसेच एकाची प्रकृती चिंताजनक आहे. या घटनेत दोन लहान मुले किरकोळ जखमीझाली आहेत

कित्तूर कडून खानापुर तालुक्यातील गुलल्ली गावात लग्नासाठी कारने जात असताना चालकाचे नियंत्रण सुटले आणि कार थेट झाडावर आदळली. या धडकेने अचालकाच्या शरीराचा चक्काचूर झाला. तर वाहनाचा पूर्ण चुराडा झाला. स्थानिक नागरिक आणि पोलिसांनी घटनास्थळावरून मृतदेह बाहेर काढले. जखमींना जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. एसपी भीमाशंकर गळेद , डीएसपी, सीपीआय यांच्यासह नंदगड पोलिसांनी घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली.


Share News