कुडची रोडवर अपघात, एक ठार
बेळगाव : बेळगावहून सांबरा गावात जात असताना कुडची रोडवर झालेल्या अपघातात एकजण जागीच ठार झाला आहे. चेकपोस्टच्या बॅरीकेड्सला धक्का लागून पडल्यानंतर मागून येणाऱ्या डंपरने चिरडल्याने दुचाकीस्वाराचा जागीच मृत्यू झाला आहे.
शिवगौंडा रामगौडा देसाई (वय ६२) असे मृत व्यक्तीचे नाव असून ते सांबरा येथील चावडी गल्लीतील रहिवासी होते. सांबरा येथील महालक्ष्मी देवस्थान कमिटीचे सदस्य म्हणून ते कार्यरत होते. त्यांच्या पश्चात पत्नी, दोन मुले असा परिवार आहे.