बसवाण गल्लीत पडला अंबिल घुगऱयांचा प्रसाद
सालाबाद प्रमाणे बेळगावची बसवाण देवस्थान यात्रा बसवान गल्ली आज मंगळवार दिनांक 9 एप्रिल रोजी आंबील घुगऱ्या व गाडे फिरवण्याचा कार्यक्रम बसवाण गल्ली येथे पार पडला.
त्याचप्रमाणे या यात्रेला चव्हाट गल्ली श्री ज्योतिर्लिंग देवस्थानाचे बसवाण सासनकाठी दरवर्षीप्रमाणे चव्हाट गल्लीतून यात्रा करण्यासाठी सायंकाळी निघते व बसवाण गल्ली येथे येऊन रात्रभर विविध धार्मिक कार्यक्रमात सहभाग होते.
उद्या होणाऱ्या इंगळ्या च्या कार्यक्रमाला सायंकाळी पाच वाजता ही सासन काठी सहभाग होते व इंगळ्याचा कार्यक्रम झाल्यानंतर ती परत वाजत गाजत प्रस्थान होते .चव्हाट गल्लीत पोहोचल्यानंतर आरती पूजेचा कार्यक्रम आटोपल्यावर ज्योतिर्लिंग देवस्थान येथे सांगता होते