शहरातील बारा आरो प्लांट बंद अवस्थेत
शहरातील स्मार्ट सिटी अंतर्गत उभारण्यात आलेले बारा आरो प्लांट बंद असून त्या शोभेच्या वस्तू बनल्या आहेत. त्यामुळे नागरिकांना शुद्ध पाणी मिळण्याकरिता धावा धाव करावी लागत आहे शहरांमध्ये बारा आरो प्लांट उभारण्यात आले असून त्यासाठी 96 लाखांचा निधी खर्च करण्यात आला आहे..
मात्र आता हे आरो प्लांट देखभाला अभावी बंद पडले आहेत. शहरात बंद असलेल्या आरो प्लांटमध्ये नाणे टाकून सुद्धा पाणी मिळवण्यासाठी नागरिक प्रयत्न करत आहेत.मात्र या प्लांटला पाणीपुरवठा नसल्याने टाकलेले नाणे परत येत आहे त्यामुळे नागरिकांना अधिक पैसे मोजून पाणी विकत घ्यावे लागत आहे.
2019 मध्ये स्मार्ट सिटी अंतर्गत आरोप प्लांट उभारल्यानंतर ते महापालिकेकडे वर्ग करण्यात आले.महापालिकेने शहरातील एका खाजगी संस्थेकडे याची जबाबदारी सोपविली पहिल्या सहा महिन्यात 12 पैकी पाच सुरु सुरू होते हळूहळू एकेक आरो प्लांट बंद पडत गेले. त्यामुळे ऐन उन्हाळ्यात नागरिकांना शुद्ध पाण्याकरिता धावाधाव करावी लागत आहे.