समितीच्या सहकार्यामुळे भाजपचा विजय
बेळगाव प्रतिनिधी ….
बेळगाव लोकसभा मतदारसंघात जगदीश शेट्टर यांचा झालेला विजय हा महाराष्ट्र एकिकरण समितीच्या नेते आणि कार्यकर्त्यांच्या सहकार्यामुळे झालेला आहे .अशी कबुली माजी आ. महांतेश कवटगीमठ यांनी दिली आहे त्यांनी या संदर्भात पत्रकारांशी बोलताना माजी महापौर शिवाजी सुंठकर यांच्या सहकार्याबद्दल आभार व्यक्त केले. मोदी यांच्या विजयासाठी तसेच राष्ट्रीय प्रवाहा सोबत राहण्यासाठी त्यांनी घेतलेल्या निर्णयामुळे ग्रामीण आणि दक्षिण मतदार संघात प्रचंड मताधिक्य मिळाले. त्यामधून जगदीश शेट्टर यांचा विजय सुकर झाला अशी माहिती त्यांनी दिली. बेळगाव दक्षिण मध्ये आमदार अभय पाटील यांनी केलेल्या कार्यामुळे तेथे 75 हजाराचे मताधिक्य मिळाले आहे. त्याचबरोबर ग्रामीण मतदारसंघात देखील माजी महापौर शिवाजी सुंठकर यांच्यासह माजी आ. संजय पाटील आणि सर्व भाजप कार्यकर्त्यांनी अथक परिश्रम घेतल्यामुळे हा विषय साध्य झाल्याची माहिती त्यांनी दिली.