बेळगावात काळा दिनाला परवानगी -नाहीजिल्हाधिकारी मोहम्मद रोशन
कर्नाटक राज्योत्सव दिनाच्या पूर्व तयारी बैठकीत निर्णय
दरवर्षीप्रमाणे यंदाही कर्नाटक राज्योत्सव 1 नोव्हेंबर रोजी मोठ्या थाटात साजरा होणार आहे. या दिवशी कोणत्याही कारणास्तव काळा दिवस साजरा करू दिला जाणार नाही अशी माहिती जिल्हाधिकारी मोहम्मद रोशन यांनी बेळगाव जिल्हा पंचायत सभागृहात आयोजित कर्नाटक राज्योत्सव दिनाच्या पूर्व तयारी बैठकीत बोलताना दिली.
ऐन दिवाळी सणाच्या दिवशी म्हणजे १ नोव्हेंबरला बेळगावात कर्नाटक राज्योत्सव साजरा केला जाणार आहे.राज्योत्सवाच्या पार्श्वभूमीवर आवश्यक ती तयारी करण्याच्या सूचना त्यांनी अधिकाऱ्यांना दिल्या. आज बरोबर महाराष्ट्र समितीच्या वतीने एक नोव्हेंबर दिवशी आयोजित करण्यात आलेल्या काळा दिनाला कदापिही परवानगी दिली जाणार नाही असेही त्यांनी यावेळी बोलताना सांगितले.