संजय पाटील यांची पोलीस स्थानकात लेखी तक्रार
जीवे मारण्याची धमकी -अशी तक्रार
मंत्री लक्ष्मी हेंबाळकर यांच्या चीथावणी वरून शंभरहून अधिक जणांनी बेकायदेशीर आपल्या घरात प्रवेश करत जीवघेणा हल्ला करून अर्वाच्या शब्दात शिवीगाळ केली.तसेच जिवे मारण्याची धमकी दिली अशी तक्रार माजी आमदार संजय पाटील यांनी शहापूर पोलीस स्थानकात दिली आहे.रविवारी रात्री माजीआमदार संजय पाटील यांनी शहापूर पोलीस स्थानकात जाऊन लेखी तक्रार पोलिसांकडे दिली मंत्री लक्ष्मी हेबाळकर यांनी आपल्या अधिकाराचा दुरुपयोग करत चिथावणी दिल्याने अनेक महिलांसह शंभर जणांविरुद्ध तक्रार दिली आहे
.संजय पाटील यांच्या आदर्श नगर येथील घरासमोर जाऊन काही महिलांनी त्यांच्या घरात शिरण्याचा प्रयत्न केला अर्वाच्या शब्दात शिवीगाळ करून जिवे मारण्याची धमकी दिल्याचा आरोप संजय पाटील यांनी फिर्यादीत केला आहे.