काँग्रेस भाजप कार्यकर्त्यांमध्ये चप्पलने हाणामारी
मारामारी चा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल
चप्पलने हाणामारीचा व्हिडिओ चर्चेचा विषय
लोकसभेसाठी राज्यात मतदान झाले असून 4 जून रोजी होणाऱ्या मतमोजणीकडे सर्वांचेच लक्ष लागले आहे. त्यामुळे अनेक कार्यकर्त्यांकडून जोरदार बॅटिंग सुरू आहे.चिकोडीत असाच प्रकार घडला आहे .
चिकोडी येथील नगरपरिषेच्या शेजारी असलेल्या एका दारू विक्रीचे दुकानासमोर भाजप व काँग्रेसच्या कार्यकर्त्यांमध्ये आपलाच उमेदवार निवडून येणार अशी चर्चा सुरू होती. हळूहळू या चर्चेचे रूपांतर हाणामारी झाली आणि दोन्ही बाजूकडून चप्पलने मारहाण करण्यात आली
यावेळी लावलेल्या बॅटिंगचे पर्यवसान चप्पल ने हाणामारी पर्यंत गेले आहे. त्याचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर वायरल झाला असून सर्वत्र याचीच चर्चा दिसून येत आहे
चिकोडी लोकसभा मतदारसंघात सात मे रोजी निवडणूक झाली असून भाजप उमेदवार खासदार अण्णासाहेब जोले व काँग्रेस उमेदवार प्रियांका जारकीहोळी यांच्यात लढत होत आहे. यंदाचे निवडणुकीत मतदान टक्के वाढला असून दोन्ही पक्षांकडून विजयाचा दावा करण्यात येत आहे .उमेदवारांचे भवितव्य मते
यंत्रामध्ये लॉक झाली असून सर्वांचे लक्ष निकालाकडे लागलेआहे.त्यामुळे कार्यकर्त्यांकडून पैज लावण्यात येत आहेत.कोणत्या पक्षाचा उमेदवार निवडून होणार ही एकच चर्चा सर्वत्र सुरू आहे भाजप काँग्रेसचे कार्यकर्ते आपलाच उमेदवार निवडून येणार असल्याचे ठासून सांगत आहेत