म्हादाई आणि कळसा भांडुराचे पाणी वळविण्याचा सरकारचा चुकीचा घाट
म्हादाईचे पाणी दुसऱ्या बाजूने नेले तर होणार जैविविधतेवर विपरीत परिणाम
कर्नाटकाला मोठा धोका
बेळगाव शहरातील कन्नड साहित्य भवन मध्ये प्रोजेक्टरच्या माध्यमातून कळसा भांडूरा प्रकल्पाचे पाणी जर वळवीले तर कोणते परिणाम होतील याबद्दल सविस्तर माहिती दिली.
यावेळी नितीन धोंड म्हणाले की धरणे कालवे बांधल्यामुळे आणि पाण्याखाली गेल्याने खानापूरच्या घनदाट जैवविविध जंगलाचे थेट नुकसान होणार आहे दोन लाखाहून अधिक झाडे तोडली जाणार आहेत त्यामुळे जंगलाचे तुकडे होणार आहेत.
म्हादाई चे फक्त 3.9 नऊ पाणी वाटप कर्नाटकाला होते. तर पाणी धरणाला वळविले गेले आहे सुप्रीम कोर्टाने सुद्धा हे पाणी फक्त पिण्याच्या पाण्यासाठी वापरण्यात येईल असे सांगितले आहे पाणी फक्त पिण्यासाठी वळविण्याचे सरकार म्हणत असेल तर राजकारणी नदीपात्रातील शेतकऱ्यांना खोटी आश्वासने देऊन कोणताही विचार न करता महादाई आणि कळसा भांडुराचे पाणी वळविण्याचा घाट घातला आहे. कर्नाटकाला महादाईच्या पाण्याची अत्यंत गरज आहे मात्र पाणी दुसऱ्या बाजूने वळविल्यास याचा कर्नाटकाला धोका निर्माण होणारा आहे.
डोंगरावर असलेल्या झाडांमुळे पाऊस निर्माण होतो.त्यामुळे पर्जन्य बाष्पीभवन बाष्पोजन होऊन पाऊस पडतो. आयआयटी बॉम्बे अभ्यासात सुद्धा पश्चिम घाटातील जंगले मान्सूनला 40% आद्रता देतात असे सिद्ध करण्यात आले आहे. तर खानापूर जंगलात झालेल्या पावसामुळे नवलतीर्थ येथील रेणुका साखर जलाशयात 85 टक्के पाणीसाठा
आहे. कळसा आणि भांडूरा धरणे म्हादईचे पाणी भिमगड कर्नाटक आणि म्हादाई गोवा महाराष्ट्राच्या जंगलापासून गेले तर खानापूर तालुक्याच्या नैऋत्येकडील ५०० चौरस किलोमीटर जैव विविध जंगलावर याचा विपरीत परिणाम होणार असल्याचे मत यावेळी पर्यावरण नितीन धोंडे यांनी प्रसार माध्यमांसमोर मांडले.