मुख्यमंत्र्यांनी मागितली मंत्री हेब्बाळकरांची माफी
मुख्यमंत्र्यांनी माफी मागितल्याने राजकीय वर्तुळात चर्चेला उधाण
माफी मागितल्याचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल
कक्षात प्रवेश करताच हेब्बाळकरांना पाहून सिद्रामयया यांनी म्हण्टले सॉरी अम्मा
लोकसभा निवडणुकीच्या निकालाने काँग्रेसच्या काही नेत्यांना आनंद दिला आहे, तर अनेकांना दुखावले आहे. दरम्यान, बेळगावमधून आपल्या मुलाला उमेदवारी देणाऱ्या मंत्री हेब्बाळकर यांची मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांनी माफी मागितल्याचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.
निवडणूक निकालानंतर बेंगळुरूला गेलेल्या बेळगाव जिल्हा काँग्रेस नेत्यांच्या पथकाने मुख्यमंत्री सिद्धरामय्यांची भेट घेतली आहे. यावेळी मुख्यमंत्री सिद्ररामय्या यांनी मंत्री लक्ष्मी हेब्बाळकर यांना सॉरी अम्मा म्हटल्याने सध्याच्या राजकीय वर्तुळात जोरदार चर्चेला उधाण आले आहे.मंत्री हेब्बाळकर यांनी आपल्या मुलगा मृणाल हेब्बाळकर यांना बेळगाव लोकसभा मतदार संघातून उमेदवारी दिली होती मात्र त्यांचा पराभव झाला.