मार्कंडेय नदीच्या किनारी पारायण सोहळ्याची सुरुवात
उचगाव येथील मार्कंडेय नदीच्या किनारी पारायण सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी पहिल्या दिवशीच्या ध्वजारोहणाचा कार्यक्रम उचगाव येथील रहिवासी ज्येष्ठ नागरिक लक्ष्मी महादेव पाटील यांच्या हस्ते करण्यात आले. त्यानंतर श्रीकांत चोपडे या दांपत्यांच्या हस्ते पूजन करण्यात आले. यावेळी सपत्नीच्या दाम्पत्यांचा सत्कार करण्यात आला तसेच ज्येष्ठ नागरिक लक्ष्मी पाटील यांचा देखील यावेळी सत्कार करण्यात आला यावेळी या कार्यक्रमाला भागातील वारकरी सांप्रदायिक भजनी मंडळ आणि उचगाव गावातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.