एन्जल फाऊंडेशच्या अध्यक्षा मीनाताई अनिल बेनके यांच्या वतीने भाजीविक्रेत्याना डेंग्यू ड्रॉप वितरण
पावसामुळे उद्भवणाऱ्या आजारापासून संरक्षण व्हावे याकरिता एंजल फाउंडेशन च्या वतीने शहरातील बाजारपेठ भाजी विक्रेत्यांना डेंगू चे ड्रॉप्स घालण्यात आले. यावेळी एंजल फाउंडेशनच्या संस्थापिका अध्यक्षा मीनाताई बेनके यांनी भाजी विक्रेत्यांना डेंग्यूचे ड्रॉप घालून आपल्या आरोग्याची काळजी घ्यावी असे सांगितले. यावेळी एंजल फाउंडेशनचे उपाध्यक्ष दीपक सुतार सदस्य क्रितेश कावळे संदीप बडवानाचे, सुनिता होस्मनी राणी येलनगौडा, अक्षता नाईक यांच्यासह अन्य उपस्थित होते.

