उच्च न्यायालयाचा आदेश पायदळी तुडवत हलगा मच्छे बायपास रस्त्याचे काम सुरू केल्याने आज संतप्त शेतकऱ्यांनी चन्नम्मा सर्कल येथे लोटांगण घालून आंदोलन केले. आणि कर्नाटक सरकारचा निषेध केला. यावेळी पोलीस प्रशासनाने, शेतकऱ्यांना लोटांगण घालण्यापासून थांबविले आणि त्यांना अटक करण्याचा प्रयत्न केला.
यावेळी अडून राहिलेल्या शेतकऱ्यांनी पर्यंत आम्ही जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देत नाही तोपर्यंत इथून जाणार नाही असा आक्रमक पवित्रा घेत जिल्हाधिकारी कार्यालयापर्यंत आंदोलन करत निवेदन दिले.
हलगा मच्छे बायपास रस्ता सुपीक जमिनीतून होत आहे यामुळे शेतकऱ्यांनी पूर्वीपासूनच विरोध केला आहे. न्यायालयाने ही या कामाला स्थगिती दिली असताना दडपशाही करत हा रस्ता केला जात आहे.
ही बाब अत्यंत गंभीर आहे न्यायालयाचा हा अवमान आहे त्या विरोधात आम्ही न्यायालयीन लढाई लढणारच मात्र आता त्यावरील लढाई ही लढणार असे म्हणून शेतकऱ्यांनी आज लोटांगण घातले.
सरकार शेतकऱ्यांना नुकसान भरपाई देऊ असे सांगत असले तरी त्या नुकसान भरपाई पासून शेतकऱ्यांना जमीन मिळणे अवघड आहे.
हलगा मच्छे बायपासचा जो पट्टा आहे त्यामध्ये बासमती ऊस कडधान्य तसेच भाजीपाला पिकवणारी जमीन आहे याच मार्गातून बायपास करण्याचा घाट सरकारने घातला आहे. त्याचा विरोध आज शेतकऱ्यांनी लोटांगण घालून केला.