शिवजयंती चित्ररथ पात्रांना मोफत रंगभूषा
बेळगाव लाईव्ह : बेळगाव सह सीमा भागात गेल्या 105 वर्षापासून वैशाख शुद्ध द्वितीयेला पारंपरिक पद्धतीने शिवजयंती साजरी केली जाते.
अक्षय तृतीयेच्या आदल्या दिवशी गड किल्ल्यावरून शिवज्योत आणली जाते आणि छत्रपती शिवरायांच्या मूर्तीची प्रतिष्ठापना मंडळे ठिकठिकाणी करतात. अक्षय तृतीया दिवशी वडगाव आणि अनगोळ परिसरात चित्ररथ मिरवणूक काढली जाते तर दुसऱ्या दिवशी बेळगाव शहरात शिवजयंती चित्ररथाची मुख्य मिरवणूक काढली जाते.
शिवजयंतीनिमित्त काढल्या जाणाऱ्या या मिरवणुकीत अवघी शिवचरित्रचं बेळगावच्या रस्त्यावर अवतरलेले चित्र पाहायला मिळते. शिवाजी महाराज जन्मोत्सवापासून शिवराज्याभिषेक सोहळ्यापर्यंतचे हालते देखावे विविध मंडळे दाखवत असतात.
मागील वर्षीप्रमाणे सकल मराठा समाज बेळगाव आणि शहर महाराष्ट्र एकीकरण समिती यांच्या माध्यमातून बेळगाव शहर परिसरातील चित्ररथ मिरवणुकीतील पात्रांना मोफत रंगभूषा (मेकअप) करण्यात येणार आहे.
शुक्रवारी वडगाव परिसरातील आणि शनिवारी बेळगाव शहराच्या मुख्य मिरवणुकीसाठी रंगभूषा करण्यात येणार आहे यासाठी विशेष टीमची नियुक्ती करण्यात आली असून ज्या शिवजयंती मंडळांना आपल्या चित्ररथांतील पात्रांसाठी रंगभूषा करायची असल्यास त्यांनी सकल मराठा समाज महाराष्ट्र एकीकरण समितीची संपर्क साधण्याचे आवाहन करण्यात आलेले आहे.
शुक्रवारी आणि शनिवारी दुपारी तीन वाजल्यानंतर लक्ष्मण निवास तळमजला डबल रोड खासबाग येथे यावे किंवा गुणवंत पाटील (+919740868181), सागर पाटील (+919964777565), राजेंद्र बैलूर(+919036505490) , ज्योतिबा पालेकर (+91 6362-482603) विराज मुरकुंबी( 9945864341) यांच्याशी संपर्क साधावा असे आवाहन करण्यात आले आहे.
मागील वर्षी देखील सकल मराठा समाजाच्या वतीने मोफत रंगभूषा शिवजयंती मंडळाच्या पात्रांना करण्यात आली होती त्याला उत्स्फूर्त असा प्रतिसाद मिळाला होता या वर्षी देखील मोफत रंगभूषा करण्यात येणार आहे त्यामुळे शिवजयंती मंडळांनी याचा लाभ घ्यावा असे कळविण्यात आले आहे.