करायची होती पित्तायशाची शस्त्रक्रिया चुकून केली नसबंदीची !
डॉक्टरांच्या एका चुकीमुळे युवकाचे आयुष्यच बदलून लागेल्याची घटना नोंद घेण्याजोगी म्हणावी लागेल. संबंधित युवक पित्ताशयाची शस्त्रक्रिया करुन घेण्यासाठी रुग्णालयात गेला होता. डॉक्टरांनी त्याला शस्त्रक्रियेसाठी ओटीमध्ये घेतेले आणि थेट नसबंदीचीच शस्त्रक्रिया केली. साहजिकच या प्रकारानंतर एकच खळबळ उडाली.
ही घटना अर्जेंटिनातील असून त्यामुळे जॉर्ज बेसटो नामक युवकाला हकनाकच मोठी किंमत चुकवावी लागली आहे. तो शहरातील फ्लोरेंसिओ डायझ कॉर्डोबाच्या रुग्णालयात शस्त्रक्रियेसाठी दाखल झाला. २८ फेब्रुवारी २०२४ रोजी त्याच्यावर शस्त्रक्रिया होणार होती.
मात्र काही कारणामुळे ती पुढे ढकलण्यात आली. पण असे असतानाही ऐनवेळी त्याच्याकडे एक डॉक्टर आले आणि केसपेपर न पाहताच नसबंदीची शस्त्रक्रिया करुन मोकळे झाले.
त्यानंतर कोणीही घडलेल्या प्रकारची जबाबदारी घेण्यास तयार नव्हते. या घटनेनंतर त्याच्यावर पित्ताशयाची शस्त्रक्रियाही करण्यात आली. या संपूर्ण प्रकारानंतर जॉर्ज बेसटो याचे संपूर्ण जीवनच बदलून गेले. त्याने याबद्दल म्हटले आहे, की मला शस्त्रक्रियेसाठी घेऊन जाण्यापूर्वी किमान एकवेळ तरी त्यांनी चार्ट बघायला हवा होता. मी कोणालाही दोष देत नाही; परंतु हा प्रकार हैराण करणारा आहे. आता जॉर्ज बेसटो या हलगर्जीपूर्ण प्रकरणाविरोधात कोर्टात धाव घेणार आहे.