Share News

विमल फाउंडेशनद्वारे आयोजित ‘बिग बॉक्स क्रिकेट लीग’चे भव्य उद्घाटन संपन्न

विमल फाउंडेशनच्या वतीने आयोजित ‘बिग बॉक्स क्रिकेट लीग’चे उद्घाटन मोठ्या उत्साहात आणि थाटामाटात इंडोर अकॅडमी येथे पार पडले. उद्घाटनप्रसंगी विमल फाउंडेशनचे अध्यक्ष श्री. किरण जाधव, कुलदीप मोरे व हेमंत लेंगडे यांची प्रमुख उपस्थिती होती.

या स्पर्धेत एकूण सहा संघांनी सहभाग घेतला असून, पुढील दोन दिवसांमध्ये चुरशीच्या लढती रंगणार आहेत. विजेता आणि उपविजेता संघांसह उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या खेळाडूंनाही विशेष वैयक्तिक पारितोषिकांनी गौरवण्यात येणार आहे.

क्रिकेटप्रेमींसाठी ही स्पर्धा एक पर्वणी ठरणार असून, स्थानिक युवा खेळाडूंना आपल्या कौशल्याचे प्रदर्शन करण्यासाठी एक उत्तम व्यासपीठ मिळाले आहे.


Share News