नेहा हिरेमठला न्याय मिळण्याकरिता हिंदू समाज एकवटला
फयाज या नराधमांना फाशी देण्याची मागणी
अखिल कर्नाटक जंगम समाज यांच्यावतीने आज जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढून हिंदू युवतीला न्याय देण्याची मागणी केली आहे. हुबळी मध्ये शिक्षण घेत असलेल्या युवतीची अमानुषपणे कॉलेजच्या आवारात हत्या करण्यात आली. मुस्लिम युवकांनी तिची हत्या केली आहे.
त्यामुळे त्या युवकाला लवकरात लवकर फाशीची शिक्षा द्यावी अन्यथा त्याला त्याच्यावर गोळ्या झाडून ठार करावे अशी मागणी अखिल कर्नाटक जंगम समाजाच्या वतीने जिल्हाधिकाऱ्यांकडे निवेदनाद्वारे करण्यात आली आहे.
यावेळी आंदोलनात जंगम समाज, लिंगायत समाज,हिंदू समाजाचे सर्व बांधव मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. चन्नम्मा सर्कल येथे रॅली काढून त्यांनी जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन दिले.
हिंदू मुली जर महाविद्यालयात सुरक्षित नसतील तर त्यांचे जीवन असहाय्य होईल त्यामुळे हिंदू मुलींच्या संरक्षणाकरिता फयाज सारख्या नराधामाला कडक शिक्षा द्यावी अशी मागणी केली आहे.