काँग्रेस पक्षाची ताकद दिवसेंदिवस वाढत आहे माजी नगरसेवक राजपठाण शेर गुलखान पठाण यांच्यासह बेपारी समाज सहारा स्पोर्ट नागराज युवक मंडळाचे शेकडो कार्यकर्त्यांनी पुन्हा काँग्रेसमध्ये प्रवेश करून पक्षाला साथ दिली आहे असे मनोगत सतीश जारकीहोळी यांनी व्यक्त केले.
भाजपमध्ये प्रवेश केलेल्या कार्यकर्त्यांनी काँग्रेसमध्ये येताच म्हणाले की त्यामुळे आम्ही आमच्या घरी पुन्हा परतलो आहे जारकीहोळी यांना आपण निवडून देणार आहोत असे सांगितले.भाजपात आपली घुसमट होत होती ती आता बंद झाली आहे असे म्हणाले
यावेळी माजी मंत्री वीरकुमार पाटील माजी आमदार काकासाहेब पाटील जिल्हा काँग्रेस अध्यक्ष लक्ष्मण चिंगळे शकिल चावलवाले सुंदर खराडे जावेदनायक फारूक गंवडी अब्बास फरास राजेंद्र चव्हाण अन्वर बागुलवान इलियास पटवेकर फजर पठाण हसनमुल्ला जमीर पठाण मुसा पटेल इर्शाद बागवान सुजय पाटील राजेश कदम यांच्यासह काँग्रेसचे कार्यकर्त्यांनी सदस्य उपस्थित होते.