Share News

खानापूर पोलिसांनी शहरातील लॉजवर टाकला छापा

वेश्याव्यवसाय करणा-या रिंगचा छडा

11 तरुण पोलिसांच्या ताब्यात तर पाच तरुणीची सुटका

बेळगाव मधील खानापूर शहराच्या मुख्य रस्त्यावरील एका लॉजवर खानापूरचे पोलीस निरीक्षक मंजुनाथ नायक यांच्या नेतृत्वाखालील पथकाने केलेल्या कारवाईत पाच तरुणींची सुटका करण्यात आली आहे तर , अकरा तरुणांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.
एका गुप्त माहितीच्या आधारे कारवाई करत खानापूर पोलिसांनी शहरातील एका लॉजवर छापा टाकून वेश्याव्यवसाय करणा-या रिंगचा छडा लावला आहे .सध्या तरुणींना महिला केंद्रात पाठवण्यात आले आहे या कारवाईत पीएसआय चन्नकेसवा बबली, हेडकॉन्स्टेबल जयराम हम्मान्नवरा, बाळाप्पा यलीगर व पोलीस कर्मचारी यांनी पहारा ठेवून ही कारवाई केली आहे .


Share News