तोतया केबल टेक्निशियने लांबविली वृद्धेच्या गळ्यातील सोनसाखळी
घटना सीसीटीव्ही मध्ये कैद
बोलण्यात गुंतवून ठेवून केली चोरी
घरात होत्या केवळ 2 वृद्ध महिला
आपण केबल टेक्निशियन आहे असे सांगत एक तरुण काल बुधवार दि. १६ ऑक्टोबर रोजी दुपारी पावणे चारच्या सुमारास ढोर गल्ली, बेळगावातील वडगाव येथील एका घरात घुसला. त्या घरातील एका वृद्ध महिलेला केबल तपासण्याच्या बहाण्याने घराच्या पहिल्या मजल्यावर घेऊन जात तिला बोलण्यात गुंतवून ठेवले. बोलता बोलता काही क्षणात त्याने त्या वृद्धेच्या गळ्यातील सोनसाखळी हिसकावून घेत तेथून पळ काढला. हि सर्व घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली असून, परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. अशा गुन्ह्यांमध्ये अनेकदा लक्ष करण्यात येत असलेल्या वृद्धांच्या सुरक्षेसाठी पोलीस अधिकाऱ्यांनी तातडीने कारवाई करण्याचे आवाहन करण्यात आले आहे. चोरी झाली त्यावेळी त्या घरामध्ये केवळ दोन वृद्ध महिला होत्या अशी माहिती समोर आली आहे.