Share News

बेंगलोरमध्ये 10 कोटींचे एम डी एम क्रिस्टल ड्रग्ज जप्त

बंगळूर शहरात ड्रग पेडलर , खरेदीदार, तस्करी करणाऱ्यांविरोधात बंगळूर शहर पोलिसांनी कारवाईची मोहीम उघडली असून, आज नायजेरियन तरुणीला अटक करून 10 कोटी रुपयांचे एम डी एम ए क्रिस्टल अमली पदार्थ जप्त करण्यात पोलिस यशस्वी झाले आहेत.

सिसिबीच्या अँटी नार्कोटिक्स पथकाने कारवाई केली असून, नायजेरियाच्या अकीनवूनमी प्रिन्सेस इफेला उर्फ प्रिन्सेस ( वय 25) या युवतीला अटक केली आहे.

सदर तरुणी 2012 साली बिझनेस व्हिसा अंतर्गत दिल्ली ला आली होती. कमी वेळेत अधिक पैसे कमविण्याच्या मोहापोटी ड्रग्स विक्री व्यवसायात उतरली असल्याचे समजते.
नवी दिल्लीतून ड्रग्स आणून बंगळूर विक्री करत असल्याची माहिती मिळताच पोलिसांनी छापा टाकून युवतीला अटक केली. तिच्याकडून 5 की लो 325 ग्रामचे एम डी एम ए क्रिस्टल ड्रग्ज, मोबाईल फोन, चुडीदार जप्त करण्यात आले आहे.


Share News