बेळगाव ब्रेकिंग
बीम्स वसतिगृहात युवतीची आत्महत्या
-काही दिवसांपूर्वीही आत्महत्येचा केला प्रयत्न
बेळगाव बीआयएमएस (BIMS) वसतिगृहात एका वैद्यकीय विद्यार्थिनीने औषध सेवन करून आत्महत्या केल्याची दुर्दैवी घटना घडली आहे.
मृत विद्यार्थिनीचे नाव प्रिया (२७), बंगळुरू येथील रहिवासी असे आहे. सोमवारी संध्याकाळपर्यंत प्रियाने जिल्हा रुग्णालयात रुग्ण तपासणी अभ्यास केला होता. मात्र रात्री तिने आपले आयुष्य संपवले. काही दिवसांपूर्वीही तिने आत्महत्येचा प्रयत्न केल्याचे समजते.
घटनेच्या ठिकाणी बीआयएमएस संचालक अशोक शेट्टी उपस्थित होते. त्यांनी सांगितले की प्रिया मानसिक आजाराने त्रस्त होती आणि नैराश्यग्रस्त झाली होती. मात्र औषध सेवन करून मृत्यू झाला का, हे पोस्टमार्टमनंतर स्पष्ट होणार आहे.

