एकतर्फी प्रेमात युवतीची हत्या;गळा चिरून केला खून
हिंदू मुलीच्या मुस्लिम युवकाने केला खून
एकतर्फी प्रेमातून हुबळीतील एका कॉलेजमध्ये युवतीची हत्या करण्यात आल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. भर दिवसा चाकूने भोसकून हुबळी मधील प्रतिष्ठित बीव्ही महाविद्यालयातील युवतीची हत्या करण्यात आली असून संशयताला काही वेळातच पोलिसांनी अटक देखील केली आहे.
नेहा हिरेमठ या एमबीबीएच्या विद्यार्थिनीची हत्या करण्यात आली असून ही घटना सीसीटीव्ही मध्ये कैद झाली आहे. बेळगाव जिल्ह्यातील सौंदतीतील रहिवासी असलेल्या एका युवक फैयाज हा गेल्या काही दिवसांपासून नेहा हिरेमठ हिच्या मागे लागला होता.
तिच्यावर तो एकतर्फी प्रेम करत होता नेहाने त्याला नकार दिला होता शिवाय पालकांनाही याबाबत सांगितले होते पालकांनाही त्यांना याबाबत इशारा दिला होता.
नेहाची एमबीबीएस ची परीक्षा सुरू होती ती परीक्षा संपून कक्षातून कॉलेज आवारात येत असताना त्याच वेळी फयाजने तिच्या गळ्यावर चाकूने वार केला यावेळी नेहा रक्ताच्या थारोळ्यात पडली .
त्यानंतर तिला तातडीने किम्स रुग्णालयात नेण्यात आले मात्र उपचाराचा काही उपयोग न झाल्याने त्याचा मृत्यू झाला. यावेळी संशयित आरोपी फयास हा चाकू टाकून घटनास्थळावरून फरार झाला यावेळी पोलिसांनी पकडले.