नम्म क्लिनिकचे आमदार राजू सेठ यांच्याहस्ते उदघाटन
बेळगाव येथील वैभव नगर मध्ये नम्म क्लिनिकचे उद्घाटन जिल्हा आरोग्य आणि कुटुंब कल्याण विभाग बेळगावच्या वतीने आमदार राजू सेठ यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी परिसरातील नागरिकांना वैधकीय सेवा मिळावी यासाठी येथे सर्व सुविधा उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत. यावेळी राजू सेठ यांनी नामक्लिनिकची पाहणी केली आणि सर्व माहिती जाणून घेतली. नामक्लिनिकमध्ये गर्भधारणा आणि बाळंतपणाची काळजी, नवजात आणि नवजात बालकांसाठी आरोग्य सेवा, संसर्गजन्य रोगांचे व्यवस्थापन, सामान्य आणि किरकोळ आजारांसाठी बाह्यरुग्ण सेवा, क्षयरोग, कुष्ठरोग आणि असंसर्गजन्य आजार, मधुमेह, उच्च रक्तदाब, फुफ्फुसांचे आजार, सांधेदुखी, संधिवात, तोंड, स्तन, गर्भाशयाच्या ग्रीवेचा कर्करोग यांची तपासणी आणि उपचार केले जातील. त्याचबरोबर या ठिकाणी डोळे आणि घशाच्या आजारांवर उपचार केले जातील .नागरिकांना शिक्षण आणि आरोग्य सुविधा उपलध करून देणे हे आपले कर्तव्य असल्याचे आमदार सेठ म्हणाले #publicreflect #nammclinic

