Share News

एथनिक्सचे नवे ट्रेंड

काही वर्षांपूर्वीपर्यंत मुलांच्या पारंपरिक पोषाखामध्ये का फारशी व्हरायटी नव्हती. मुलांची पारंपरिक फॅशन मर्यादेमध्ये अडकली होती. मात्र, गेल्या काही वर्षांमध्ये मुलांच्या कपड्यांमध्ये कुर्ता-पायजम्यापेक्षाही अनेक वेगवेगळ्या फॅशनेबल पोशाखांची भर पडली आहे. दिवसेंदिवस फॅशन आता सर्वसमावेशक होत चालली आहे. यात वेगळ्या अर्थाने सर्वसमावेशकता आली आहे. कपड्यांमधला भेदही मिटला आहे. मुलांचे पेहराव तयार करताना सिल्क आणि लिननसह इतर कपड्यांचा वापरही होऊ लागला आहे.

सुंदर नक्षीकाम केलेले पेहराव सर्वांचे लक्ष वेधून घेत आहेत. जयपूर प्रिंट, कलमकारी, माहेश्वरी कॉटन, टशर हे प्रकारही सध्या इन आहेत. साधेपणा जपणाऱ्या मुलांसाठीही पारंपरिक पण स्टायलिश प्लेन कुर्ते उपलब्ध आहेत. रंगांमध्येही बरेच प्रयोग होताना दिसत आहेत. वेगवेगळ्या रंगसंगतींनी तुम्ही तुमचा पारंपरिक लूक खुलवू शकता. मोरपंखी, लाईमस्टोन पिंक, मस्टर्ड गोल्ड, कोका ब्राउन, कार्बन ब्लॅक, मिंट ग्रीन अशा अनोख्या रंगांची आज चलती आहे. अशा वैविध्यपूर्ण रंगांचे कपडे तुमच्या वॉर्डरोबमध्ये असणे गरजेचे आहे. आज मुलांनाही खरेदीचे अनेकविध पर्याय उपलब्ध झाले आहेत.)


Share News