Share News

असा नेता मिळणे भाग्यच

नेता हा कसा असायला हवा असा जर प्रश्न पडला तर त्याचे उत्तर चंदगड विधानसभा मतदारसंघात एक फेरफटका मारला तर समजून येईल. चंदगड येथील अपक्ष उमेदवार शिवाजीराव पाटील हे आपुलकीने प्रेमाने आणि हक्काने ज्याप्रकारे सर्वांची विचारपूस करताहेत सर्वांना जवळ घेऊन कोणत्या अडीअडचणी आहेत यावर तोडगा काढतायेत. आपले कार्यकर्ते जेवले आहेत की नाही त्यांना कोणती समस्या आहे याची वेळोवेळी काळजी ते घेत आहेत. गेल्या अनेक दिवसांपासून चंदगड विधानसभा मतदारसंघात निवडणुकीची रणधुमाळी चालू आहे यातच अनेक जण निवडणुकीच्या प्रचाराकरिता काळ वेळ न बघता जात आहेत त्यामुळे या सर्वांच्या काळजीपोटी शिवाजीराव पाटील यांनी आवाहन केले आहे. फक्त आपलेच कार्यकर्ता नाही तर इतर कार्यकर्त्यांना देखील त्यांनी हे आवाहन केलं आहे. निवडणुकीच्या धामधुमीत आरोग्याकडे दुर्लक्ष करू नका प्रचारासाठी बाहेर पडताना योग्य आहार घेऊन बाहेर पडा. असं त्यांनी सांगितले तसेच नारळ पाणी लिंबूपाणी याचे प्रमाण आहारात जरूर ठेवा उन्हात प्रचार करताना टोप्यांचा वापर जरूर करा प्रचार रॅलीत वाहने वेगाने चालू नका आरोग्याची काळजी घेऊन सुरक्षित राहून मगच प्रचार करा असे आवाहन त्यांनी केले आहे. तसेच वयस्कर नागरिकांना देखील आपल्या आरोग्याची काळजी घेण्याचे आवाहन त्यांनी केले आहे.


Share News