बेळगावचे नूतन जिल्हाधिकारी मोहम्मद रोशन
जिल्हाधिकारी नितेश पाटील यांची तडकाफडकी बदली करण्यात आली आहे त्यांच्या जागी आता हेस्कॉमचे एमडी मोहम्मद रोशन यांची बेळगावच्या नूतन जिल्हाधिकारी पदी नियुक्ती करण्यात आली आहे मोहम्मद रोशन हे 2015 सालच्या बॅचचे युवा आयएएस अधिकारी आहेत.
राज्य सरकारने नुकत्याच राज्यातील वीज आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्या केल्या असून त्यात बेळगावचे जिल्हाधिकारी निलेश पाटील यांचा समावेश आहे आता नितेश पाटील यांची बदली बेंगलोर येथे लघु माध्यम उद्योग विभागाचे संचालक म्हणून करण्यात आली आहे. जवळपास दोन वर्षानंतर नितेश पाटील यांची बेळगावहून बेंगलोरला बदली झाली आहे.