ओठ फाटलेल्या(क्लेफ्ट) मुलांच्या मातांसाठी पोषण जागरूकता कार्यक्रम
7 व्या राष्ट्रीय पोषण माह 2024 निमित्त, प्लास्टिक आणि पुनर्रचनात्मक शस्त्रक्रिया विभाग, केएलई स्माईल ट्रेन प्रकल्प, केएलईएस डॉ. प्रभाकर कोरे हॉस्पिटल आणि एमआरसी, बेळगाव आणि सार्वजनिक आरोग्य विभाग, जे.एन. मेडिकल कॉलेज, काहेर बेळगाव , यांनी दि.23 रोजी ओठ फाटलेल्या(क्लेफ्ट) मुलांच्या मातांसाठी पोषण जागरूकता कार्यक्रम आयोजीत केला होता.
या कार्यक्रमाला तालुका आरोग्य अधिकारी डॉ. राजश्री पाटील, डॉ. (कर्नल) एम. दयानंद, एमडी, केएलईचे डॉ. प्रभाकर कोरे रुग्णालय आणि वैद्यकीय संशोधन केंद्र, डॉ. राजेश पोवार, संचालक – स्माईल ट्रेन प्रकल्प, डॉ. मुबशीर, एचओडी – सार्वजनिक आरोग्य, आणि डॉ. हेमा पाटील, सहाय्यक प्राध्यापक, प्रसूतीशास्त्र विभाग, ह्यांची उपस्थिती होती.
कार्यक्रमाला RBSK अधिकारी, पालक आणि त्यांची ओठ फाटलेली (क्लेफ्ट) मुलेही उपस्थित होती. डॉ. राजेश पोवार यांनी कार्यक्रमात सर्वांचे स्वागत केले आणि आरबीएसके (RBSK)अधिकाऱ्यांना ओठ फाटलेल्या(क्लेफ्ट)अर्भकांना लवकर शोधणे आणि पुढील उपचारांसाठी संदर्भित करण्याबाबत संबोधित केले. तालुका आरोग्य अधिकारी डॉ. राजश्री पाटील यांनी आश्वासन दिले की ते लवकर रेफरलवर काम करतील जेणेकरुन हॉस्पिटल आणि स्माईल ट्रेनच्या सर्व प्रयत्नांचा फायदा लहान मुलांना होईल. डॉ. (कर्नल) एम. दयानंद यांनी या सामाजिक कार्यात हॉस्पिटल कशी मदत करेल यावर बोलले आणि टीमचे सुमारे 1000 शस्त्रक्रिया केल्याबद्दल अभिनंदन केले.
डॉ. मुबशीर यांनी चांगल्या पोषणाच्या महत्त्वावर काही मुद्दे सांगितले. डॉ.हेमा पाटील यांनी मातांना संबोधित करून स्वतःच्या आरोग्याची काळजी घेण्याचे महत्त्व पटवून दिले जेणेकरून ते आपल्या कुटुंबाची चांगली काळजी घेऊ शकतील. पालकांना संवर्धन उपक्रम म्हणून त्यांच्या लहान मुलांना बाल कृष्ण म्हणून वेष परिधान करण्यास सांगितले होते. या कार्यक्रमाला त्यांच्या पालकांसह 50 मुलांची उपस्थिती होती. कार्यक्रमानंतर पोषण व स्वच्छता किट व दुपारचे जेवण वाटप करण्यात आले.