कुडची- उगार या रेल्वे मार्गावरील भराव ढासल्ल्याने एकेरी वाहतूक
कोणतीही दुर्घटना नाही
मार्गावरील वाहतूक बंद
बेळगाव ते मिरज या रेल्वे मार्गावर दुहेरीकरण आणि विद्युतीकरण झाले आहे .त्यामुळे येण्याचा व जाण्याचे मार्ग वेगवेगळे आहेत .कृष्णा नदीवरील पुलानंतर काही अंतरावर उगार कडे जाणाऱ्या मार्गावरील रेल्वे रुळाचा बाजूचा काही भाग ढासल्याने मोठी दुर्घटना टळली आहे .येथील दुहेरीकरण काम करताना मोठा भराव टाकण्यात आला होता यावर्षी प्रमाणापेक्षा जास्त पाऊस झाला आहे या मार्गाचा बाजूलाच ओढा आहे तसेच काळी माती असल्याने ही घटना घडली असावी अशी शक्यता वर्तविण्यात येत आहे
रेल्वे मार्गावरील ही घटना मंगळवारी सायंकाळी घडली असून तातडीने या मार्गावरील वाहतूक बंद करण्यात आली आहे रेल्वे खात्याचा वतीने तातडीने खचलेल्या भागावर भराव टाकण्याचा कामास काल पासून प्रारंभ करण्यात आले असून मोठे दगडे त्या खड्यात टाकण्यात येत आहेत मोठी दगडे बाहेरून आणण्यात आले आहे आज बुधवार सायंकाळ उशिरा पर्यंत हे काम पूर्ण करण्यासाठी प्रयत्न केले जाणार आहेत त्यामुळे सर्व अधिकारी येथेच तळ ठोकून आहेत