22 लाख टाक्यापासून तयार केले पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे छायाचित्र
बेळगावातील सचिन काकडे यांनी दोन महिन्यापासून केली तयारी
मोदी बेळगावला आले असता त्यांना भेट म्हणून दिले छायाचित्र
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे अनेक चाहते आहेत. मात्र बेळगावातील अशा एका चाहत्यांनी गेल्या दोन महिन्यांपासून नरेंद्र मोदी यांचे छायाचित्र काढले आहे. तेही दोऱ्याच्या सहाय्याने ,टाके घालून आणि वेगवेगळ्या दोरांच्या रंगांचा वापर करून ..
टेलरिंग चा व्यवसाय करणारे बेळगावातील नामवंत व्यवसायिक सचिन काकडे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी हे बेळगावात लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर प्रचाराकरीता बेळगाव ला येणार हे लक्षात घेऊन मोदींवर असलेल्या प्रेमापोटी त्यांनी तब्बल एक नाही दोन नाही तर दोऱ्यापासून 22 लाख स्टिच( टाके) घालून कापडावर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे चित्र रेखाटले आहे.
या छायाचित्रात नरेंद्र मोदी यांना त्यांची आई जेवण भरवते आहे.जवळपास 2 महिण्यात त्यांनी हे मोदींचे 22 लाख स्टिच असलेल्या चित्र रेखाटले असून आज पंतप्रधान नरेंद्र मोदी हे बेळगावला आले असता त्यांना भेट म्हणून दिले आहे.