विधानसौध मध्ये पाकिस्तान जिंदाबाद च्या घोषणा-विद्यार्थनांचे आंदोलन
बेळगाव प्रतिनिधी :
लोकशाहीचे मंदिर असलेल्या विधानसौध येथे पाकिस्तान झिंदाबादच्या घोषणा दिल्याच्या घटनेचा निषेध करण्यासाठी आज 28 रोजी राज्यव्यापी आंदोलन पुकारण्यात आले आहे.
काँग्रेस पक्षाचे उमेदवार सय्यद नासिर हुसैन यांच्या समर्थकांनी राज्यसभा निवडणुकीत विजय मिळवल्यानंतर पाकिस्तान झिंदाबादच्या घोषणा दिल्या त्यामुळे त्यांच्यावर कारवाई करण्यात यावी अशी मागणी अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेने केली आहे.
पाकिस्तान झिंदाबादच्या घोषणा देत असताना त्यांनी ते थांबवण्याचा प्रयत्न देखील केला नाही, तिथे असलेल्या नसीर हुसेनसह इतरांनीही आक्षेप घेतला नाही.पाकिस्तान समर्थक घोषणाबाजीवर पत्रकारांनी त्यांची प्रतिक्रिया विचारली असता, नसीर हुसेन यांनी नकार देत प्रसारमाध्यमांकडे बोट दाखवले. त्यामुळे अशा देशद्रोह्यांना पाठीशी घालणार का असा प्रश्न अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेच्या सदस्यनी विचारला आहे
काही दिवसांपूर्वी विधानसभा निवडणुकीतील विजयानिमित्त त्यांनी बेळगावात पाकिस्तान झिंदाबादचा नारा देत पाकिस्तानचा झेंडा फडकवला होता. गद्दारांना विधानसभेत जागा देण्यात आली ही चिंताजनक घटना आहे, ही बाब अत्यंत गंभीर असली तरी सरकार कोणतीही कारवाई करत नाही, अशा घटना वारंवार घडत आहेत, सरकारने तातडीने कडक कारवाई करावी अशी अभाविपची मागणी आहे.
पाकिस्तान समर्थक घोषणा देणाऱ्या व्यक्तीवर देशद्रोहाच्या गुन्ह्याखाली गुन्हा दाखल करण्यात यावा आणि योग्य तपास होऊन निकाल जाहीर होईपर्यंत राज्यसभेचे सदस्य म्हणून शपथ घेऊ नये, अशी त्यांनी मागणी केली आहे. सरकारने दोषींना तात्काळ अटक करून तुरुंगात पाठवावे. अन्यथा राज्यभर तीव्र संघर्ष छेडण्यात येईल.असा इशारा देण्यात आला आहे.