पिडिओंचे जिल्हा पंचायतीसमोर ठिय्या आंदोलन
आंदोलनाचा आजचा तिसरा दिवस
मागण्या मान्य न केल्यास बेमुदत आंदोलन करण्याचा इशारा
ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांची बदली, बढती, वेतन आणि द्वितीय श्रेणीतीलकर्मचाऱ्यांची मागण्यांसाठी गेल्या 3 दिवसांपासून पीडीओ आणि ग्राम पंचायत कर्मचाऱ्यांनी जिल्हा पंचायत कार्यालय समोर ठाण मांडून आंदोलन छेडले आहे .ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांची आणि पीडोंओ बढतीसाठी आंदोलन करत आहेत जर त्यांची मागणी पूर्ण झाली नाही तर हा संप बेमुदत असाच सुरु राहणार असल्याचे पिडिओनी सांगितले आहे.
सर्वसामान्य जनतेला ७० टक्के सेवा या स्थानिक स्वराज्य संस्था आणि ग्राम पंचायतीद्वारे पुरविल्या जातात. मात्र, ग्राम पंचायतमधील पीडीओ, सचिव, द्वितीय श्रेणीतील लेखा साहाय्यक, अध्यक्ष, उपाध्यक्ष आणि सदस्यांच्या मागणीकडे कायम दुर्लक्ष झाले आहे. ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांच्या मागण्या तातडीने मार्गी लागाव्यात, यासाठी राज्यभरात ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांनी सेवा बंद ठेवून बेमुदत संप पुकारला आहे . तातडीने पीडीओ व कर्मचाऱ्यांच्या मागण्या मान्य कराव्यात, यासाठी पीडीओ, कर्मचारी संघटनेतर्फे जि. पं. कार्यालयासमोर गेल्या 3 दिवसापासून आंदोलन सुरु आहे .