शेतकऱ्यांना उसाचा योग्य भाव देण्याकरिता बेळगावात आंदोलन
रस्ता रोको करून शेतकऱ्यांचे आंदोलन
वाढीव रक्कम न दिल्यास कारखाने चालू न करण्याचा इशारा
स्वाभिमानी शेतकरी संघटना आणि रयत संघटना यांच्या वतीने बेळगावात आज रास्ता रोको कडून निदर्शने करण्यात आली. स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष माजी खासदार राजू शेट्टी यांच्या अध्यक्षतेखाली ही निदर्शने करण्यात आली. साखर कारखाने शेतकऱ्यांना जो मोबदला देत आहे तो कमी आहे
शेतकऱ्यांना जो मोबदला मिळत आहे त्यातील तोडणी वजा करता त्या कारखान्याची जी रिकवरी आहे त्या रिकव्हरीची तुलना करता एक टक्का रिकव्हरीला साधारणतः 297 रुपये असा भाव मिळत आहे. कर्नाटकातील ज्या साखर कारखान्यांनी उसाचे गाळप गेल्यावर्षी केलेले आहे त्यांची रिकवरी 11 ते 12 टक्के अशी आहे तसेच बहुतांश साखर कारखान्यांनी 3100 पेक्षा जास्त रुपये शेतकऱ्यांना दिले नसल्याने हा भाव कमी आहे त्यामुळे हा भाव वाढवून द्यावा तसेच सरकारने हा सर्व हिशोब तपासावा अशी मागणी आंदोलनाद्वारे बेळगाव मध्ये करण्यात आली.
कर्नाटकामध्ये सरकारने काळ्या बाजारात साखर विकलेली आहे. त्यांनी दाखवलेली रिकवरी शेतकऱ्याची लूट कशाप्रकारे केली आहे हे यातून दिसून येईल त्यामुळे कीमान शेतकऱ्यांना दोनशे रुपये वाढवून द्यावे नाहीतर कारखाने चालू देणार नाही असा इशारा राजू शेट्टी यांनी दिलाय.