Share News

कळसा भांडुरा नाला जोडणी प्रकल्प

कर्नाटक राज्य कळसा भांडुरा नाला जोडणी महिला आंदोलक संघाची मागणी

​उत्तर कर्नाटकातील नागरिकांच्या पिण्याच्या पाण्याचा प्रश्न लवकर सोडविण्यासाठी अत्यंत जरुरी असलेला कळसा भंडुरा नाला जोडणी प्रकल्प लवकरात लवकर पूर्ण व्हावा यासाठी केंद्राकडे पाठपुरावा करावा अशा मागणीचे निवेदन आज जिल्हाधिकाऱ्यांमार्फत मुख्यमंत्री आणि केंद्राला कर्नाटक राज्य कळसा भांडुरा नाला जोडणी महिला आंदोलक संघाची वतीने देण्यात आले.
या प्रकल्पामुळे उत्तर कर्नाटकात असलेला पिण्याच्या पाण्याचा प्रश्न दूर होणार आहे
​कळसा भांडुरा नाल्यातील पाणी कणकुंबी भागात फार मोठ्या प्रमाणात असते. या पाण्याचा वापर न होता ते पाणी असेच नेहमी वाया जात होते. हा प्रकल्प पूर्ण करण्यासाठी गेल्या साठ वर्षापासून सरकार प्रयत्न करीत आहे. पण इतक्या प्रदीर्घ काळानंतरही हा प्रकल्प अद्याप पूर्णावस्थेत आलेला नाही. यासाठी अनेक कारणे आहेत. सरकारची मंजुरी, वनखात्याची मंजुरी, जल खात्याची मंजुरी, आंतरराज्य पाणी वाटपाचा प्रश्न या सर्व गोष्टी कारणीभूत आहेत. पण या सर्व कारणामुळे उत्तर कर्नाटकातील नागरिकांना पिण्यायोग्य पाण्याच्या मोठ्या समस्येला तोंड द्यावे लागत आहे. आपण या समस्येत लक्ष घातला तर हा प्रश्न लवकर सुटेल अशा मागणीचे निवेदन आज देण्यात आले .

राज्याकडून राज्याचे मुख्यमंत्री, माननीय मंत्री गण, खासदार, आमदार,आणि आम्ही सर्व आंदोलनकर्ते याचा पाठपुरावा करीत आहेत. आम्ही आमच्या आंदोलनाद्वारे हा प्रश्न पुढे न्यावा यासाठी प्रयत्न करीत आहोत. आपण आमच्या या प्रयत्नाला केंद्रामध्ये योजना पूर्तीसाठी प्रयत्न केले तर कळसा भांडुळी प्रकल्प लवकर पूर्ण होईल अशी मागणी केली.


Share News