बेळगावसह सहा जिल्ह्यात रेड अलर्ट
बेळगाव कारवार गुलबर्गा यासह अन्य जिल्ह्यांमध्ये आगामी सहा दिवसात जोरदार पावसाची शक्यता हवामान खात्याने व्यक्त केली आहे.गेल्या चार दिवसांपासून मान्सून ने जोर धरला आहे त्यामुळे अनेक भागात मोठ्या प्रमाणात आणि संततधार पाऊस पडत आहे. त्यामुळे जनजीवन विस्कळीत झाले आहे. बेळगाव मध्ये सुद्धा संततधार सुरू असल्याने शाळकरी आणि विद्यार्थ्यांचे हाल होत आहेत.तसेच जिल्ह्यामध्ये लोकांना नदीकाठी वीज खांबाजवळ वीज तारांजवळ जाऊ नये असे कळविण्यात आले आहेत.अनेक जिल्ह्यामधील नद्या तुडुंब भरून वाहत आहे. तसेच काही ऐतिहासिक मंदिर देखील पाण्याखाली गेली आहेत.