Share News

भर पावसातही शिवरायांच्या मावळ्यांनी दुर्गामाता दौड यशस्वी

एकात्मतेचे दर्शन घडविताना युवा पिढीला उज्वल आणि सक्षम भवितव्याची सदिच्छा देण्यासाठी नागरिक प्रचंड संख्येने बेळगावात आयोजित दुर्गा माता दौडमध्ये सहभागी होतात.
आठव्या दिवशीच्या श्री दुर्गा माता दौडिची सुरुवात ध.संभाजी महाराज चौक येथून झाली. यावेळी ध. संभाजी महाराजांचे विधिवत पूजन करण्यात आले. त्यांनतर ध्वज चढविण्यात आला. नंतर प्रेरणा मंत्र म्हणून भर पावसात दौडिला प्रारंभ झाला. त्यानंतर ही दौड बेळगाव मधील विविध गल्ल्यांमधून संयुक्त महारष्ट्रा चौक येथे पोहचलीकेले
बाजीप्रभूं देशपांडे यांनी जशी पावनखिंड लढवली आणि महाराजांना सुखरूप विशाळगडावर पोहोचून स्वराज्य वाचवले तसेच काहीशी आजच्या दुर्गा माता दौड मुसळधार पावसात आपण सर्वांनी मोठ्या निष्ठेने आज पूर्ण केला आपले खूप कौतुक आहे दुर्गामाता दौडीतून शिवाजी महाराजांचा विचार याच पद्धतीने आपण घ्यायचा आहे. असे किरण गावडे त्यांनी सांगितले

*त्यांनतर देशातील नामवंत उद्योगपती रतनजी टाटा यांचे दुःखद निधन झाले यानिमित्त त्यांना मौन पाळून श्रद्धांजली वाहण्यात आली*

त्यानंतर मारुतीरायाची आरती करून ध्येय मंत्र म्हणून प्रमुख पाहुणे प्रसाद मेडिकल मॉलचे संचालक सी.के.पाटील तसेच खडे बाजार पोलिसांचे पोलीस निरीक्षक दिलीप निंबाळकर व माजी महापौर रेणू किल्लेकर यांच्या हस्ते ध्वज उतरवण्यात आला.

भर पावसातही अनेकांनी गल्लोगल्ली उत्स्फूर्तपणे स्वागत केले होते. विशेष म्हणजे बाळ गोपाळ आणि महिला वर्ग यांनीही पावसात दौड पूर्ण केली. जिजाबाई आणि बाल शिवाजी असा उत्कृष्ट देखावा यावेळी सादर करण्यात आला.


Share News