मॉडर्न जिम पुरस्कृत बेळगांव श्री शरीरसौष्ठव स्पर्धेतील विजेत्या चषकाचा अनावरण सोहळा उत्साहात.
बेळगांव ता 18.
काकतीवेस येथील मॉडर्न जीमच्या सभागृहात बेळगांव जिल्हा शरीरसौष्ठव संघटेनेच्या मान्यतेने मराठा मंदिरच्या सभागृहात मंगळवार ता 27 जानेवारी रोजी होणाऱ्या मराठा युवक संघ आयोजित 60 व्या बेळगांव जिल्हास्तरीय बेळगांव श्री व बेळगाव हरक्युल शरीरसौष्ठव स्पर्धेतील विजेत्या स्पर्धकांना देण्यात येणाऱ्या चषकाचे अनावरण करण्यात आले.
यंदा या स्पर्धेतील विजेत्या स्पर्धकांना देण्यात येणाऱ्या चषक मॉडर्न जीमचे संचालक किरण कावळे व रितेश कावळे यांनी पुरस्कृत केली आहे.या चषक अनावरण सोहळ्याला प्रमुख पाहुणे मराठा युवक संघाचे अध्यक्ष बाळासाहेब काकतकर, चंद्रकांत गुंडकल मॉडर्न जीमचे संस्थापक किरण कावळे, बेळगाव जिल्हा शरीरसौष्ठव संघटनेचे अध्यक्ष एम गंगाधर,, दिनकर घोरपडे, मिस्टर इंडिया सुनील आपटेकर, हेमंत हावळ, शेखर जाणवेकर, सदानंद बडवाण्णाचे, रितेश कावळे, संदिप बडवाण्णाचे,गणेश गुंडप, स्वरूप मैथी या मान्यवरांच्या हस्ते बेळगांव श्री विजेत्याला देण्यात येणारया चषकाचे अनावरण करण्यात आले.
या प्रसंगी किरण कावळे, मिस्टर इंडिया सुनील आपटेकर, बाळासाहेब काकतकर, चंद्रकांत गुंडकल यांनी मराठा युवक संघाच्या संस्थेच्या कार्याचा आढावा घेण्यात आला व जुन्या गोष्टींना उजाळा देण्यात आला. मराठा युवक संघटनेचे संस्थापक अध्यक्ष कै एल आर पाटील, अप्पासाहेब पवार, चंद्रकांत देवगेकर यांनी केलेल्या कार्याचा आढावाही आजच्या चषक उद्घाटन समारंभात घेण्यात आला. याप्रसंगी जिल्हा शरीर सौष्ठव संघटनेचे पदाधिकारी, मॉडर्न जीमचे सदस्य,मराठा युवक संघाचे पदाधिकारी उपस्थित होते.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन राजू मुचंडी यांनी केले तर किरण कावळे यांनी आभार मानले.

