फास लावून घेऊन महिलेचा संशयास्पद मृत्यू
घरात साडीने फाशी लावून संशयास्पदरीत्या विवाहीत महिलेचा मृत्यू झाल्याची घटना तालुक्यातील करोशी येथे घडली आहे.
जुवेरीया जावीद मुल्ला ( वय 28) मयत महिलेचे नाव आहे.
याबद्दल पोलिसांकडून मिळालेली अधिक माहिती अशी की मयत जुवेरीया व पतीमध्ये वारंवार भांडण होत असे यामुळे तिला वारंवार माहेरी पाठवून दिले जात होते. यामुळे मानसिक करून घेऊन दि 10 रोजी सायंकाळी पाच ते 5.30 वाजण्याच्या दरम्यान घरातील जेवणाच्या खोलीत साडीने फाशी लावून घेतल्याने मयत
झाली आहे.
याप्रकरणी मयत विवाहित महिलेच्या आई अफसाना करीम मुल्ला रा.इंचलकरंजी यांनी चिकोडी पोलिस स्थानकात फिर्याद दाखल करून आपल्या मुलीचा मृत्यूबदल संशय असून पुढील तपास करण्यात यावे असे फिर्याद दाखल केली आहे.
आज सकाळी बेळगाव येथे इस्पितळात उत्तरीय तपासणी झाली असून पोस्टपार्टम रिपोर्ट आल्यानंतर स्पष्ट होणार असल्याचे चिकोडी पीएसआय सचिन दासरेड्डी यांनी सांगितले. सायंकाळी इंचलकरंजी येथे सदर विवाहितेवर अंत्यसंस्कार करण्यात आले आहे.